वनवासी कल्याण आश्रमाच्या अकोले येथील गृहक विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन वास्तू (इमारतीचे) उद्घाटन वनवासी कल्याण आश्रमाचे जेष्ठ कार्यकर्ते श्र...
अकोले येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या गृहक विद्यार्थी वसतिगृह नविन इमारतीचे उद्घाटन संपन्न.
नगर-
प्रपंच चालविण्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी ओळखून कार्य,कर्म करावेच लागते.त्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीतून जगणे महत्वाचे असून त्यासाठी दातृत्वाची भावना असावी लागते.कारण प्रेम,धन अथवा सेवा देण्यातून मिळणारा आनंद हाच खरा शाश्वत आनंद आसतो व आज त्याची प्रचीती याठिकाणी अनुभवास येत असल्याचे मत मालपाणी उद्योग समुहाचे डॉ. संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.
वनवासी कल्याण आश्रमाच्या अकोले येथील गृहक विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन वास्तू (इमारतीचे) उद्घाटन वनवासी कल्याण आश्रमाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.बाळासाहेब दीक्षित यांच्या शुभहस्ते व मालपाणी उद्योग समूहाचे डॉ.संजय मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली अगस्ती रोड, अकोले येथे झाले.यावेळी मालपाणी म्हणाले कि, हे नूतन वसतिगृह उभे राहिले ही या वनवासी बांधवांच्या उतुंग भरारीची पाया भरणी असून त्यांचा सर्वागीण विकास निश्चित होईल. यावेळी वनवासी कल्याण आश्रम कार्यकारिणी सदस्या सौ.ठमाताई पवार,वनवासी कल्याण आश्रम प्रांत अध्यक्ष डॉ.आशुतोष माळी, योगी केशव बाबा,शरद शेळके,उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ.प्रबोध जोशी,दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री.मेघश्याम बत्तीन, डॉ.दशरथ केकरे,उपस्थित होते.
ठमाताई पवार म्हणाल्या कि,स्वयंपाक करताना पिठावर मुळाक्षरे गिरवून निरक्षर ची साक्षर झाले, त्याचे सारे श्रेय वनवासी कल्याण आश्रमास आहे.शहरवासी,ग्रामवासी व वनवासी आपण सर्व हिंदू आहोत हे अधिक महत्वाचे मानून कार्य करणारे निस्वार्थी सहकारी मिळाले व उत्तम कार्य करता आले व यापुढेही कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ.आशितोष माळी यांनी सांगितले कि, वसतिगृहाच्या मुलांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे .त्याच प्रमाणे येथे सर्वांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन सुरु आहे. यावेळी योगी केशव बाबा,शरद शेळके, हभप घारे महाराज यांनीही मार्गदर्शन केले.
वसतिगृहाच्या या नविन वास्तूसाठी मालपाणी उद्योग समूह, श्री.कृष्णा बुब, एस.एच.केळकर आणि कंपनी मुंबई, श्री.कमल तुराणी नवी दिल्ली,डॉ.प्रकाश कांकरिया, श्री.शशीभाऊ रसाळ, श्रीकांत रसाळ, श्री.ज्ञानेश्वर ताटी, श्री.दत्ता जोशी , हिंद सेवा मंडळ मॉडर्न हायस्कूल अकोलेचे शिक्षक, कर्मचारीवृंद, डॉ.आशुतोष माळी या दानशुरांचा तसेच वनवासीच्या कार्यात योगदान देणारे डॉ. राजा ठाकूर,डॉ.दिलीप धनेश्वर,डॉ.जयराम खंडेल वाल ,सलग ३० वर्ष वसतिगृहाची जबाबदारी संभाळणारे श्री.अण्णा टेके व सौ.रजनी टेके ,शशी भाऊ रसाळ,मिलिंद जोशी,श्री.दत्ताजी जोशी,माजी विध्यार्थी डॉ दशरथ केंकरे ,३२ वर्ष वसतिगृहाच्या स्वयंपाक गृहाची जबाबदारी संभाळनाऱ्या निंबा दिघे. या नूतन वास्तूचे वास्तुविशारद बी.आर.चकोर,बांधकामकर्ता संदीप कांडेकर या सर्वांचा मान्यवरांच्य हस्ते सत्कार करण्या आला.
वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वनवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण व पोषण उत्तम होण्यासाठी गृहक विद्यार्थी वसतिगृह गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या नविन वसतीगृह इमारतीबरोबरच भव्य सभागृह, मैदान, ग्रंथालय, संगणक केंद्र आदी कामे प्रगतीपथावर असून त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याच्या वनवासी कल्याण आश्रमातर्फे करण्यात आलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळाला.
सर्वांच्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या या नविन वसतिगृहाच्या उद्घाटनास व जिल्हा संमेलनास नगर जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जोंधळे व प्रा.रामदास सोनवणे यांनी केले तर आभार मेघ:शाम बत्तीन यांनी मानले.
COMMENTS