नगर- माऊली सभागृह वनवासी कल्याण आश्रम नगर शाखेतर्फे कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन मे २०१९ मध्ये करण्यात आले होते . नगर अ...
नगर- माऊली सभागृह
वनवासी कल्याण आश्रम नगर शाखेतर्फे कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन मे २०१९ मध्ये करण्यात आले होते . नगर अर्बन को.ऑप.बँक, टीजेएसबी सहकारी बँक व श्री.संत भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या यांच्या सहकार्याने आयोजित या व्याख्यानमालेत ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री विनायक गोविलकर यांनी ‘भारताचा अर्थ प्रवास’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रांत संघचालक मा.नाना जाधव,भगवान बाबा मल्टीस्टेट चे अध्यक्ष मयूर वैद्य,वनवासी कल्याण आश्रम नगर अध्यक्ष महेंद्र जाखेटे,सचिव निळकंठ ठाकरे उपस्थित होते.
व्याख्यान मालेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आला.यावेळी भारताच्या अर्थ व्यवस्थेचे विविध कालखंडातील परिणाम विषयी बोलताना गोविलकर म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जगात अस्तित्वात असलेल्या भांडवलशाही व साम्यवादी अर्थ व्यवस्था न स्वीकारता मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली.या काळात शासकीय नियंत्रण असलेले उदयोग सेवा देण्यासाठी उभे राहिले. तसेच त्या काळात पंचवार्षिक नियोजन पद्धत अमलात आली.
१९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात अस्थिर राजकीय स्थिती व नियोजन अभावी आर्थीक अशी विशेष प्रगती घडली नाही.
सन १९७७ ते १९९१ या १४ वर्षाच्या काळात देशात सात पंतप्रधान झाले.त्यात दोघांची हत्या झाली.हा कालखंड देशाच्या आर्थीक दृष्ट्या अत्यंत वाईट काळ होता.४८ टन सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याची बिकट परिस्थिती या काळात देशाने अनुभवली.
सन १९९१ ते २००८ या मध्ये खाजगीकरण उदारीकरण व जागतिकीकरणामुळे आर्थीक परिस्थिती सुधारली.अर्थ व्यवस्थेला पुनर्जीवन प्राप्त झाले.मात्र त्याचे परिणाम भविष्यात काय असतील याची जाणीव झाली नाही.देशाला भाळवनारा, सुखावणारा असा कालावधी ठरला.
सन २००८ ते २०१४ मध्ये अमेरिकेत आलेल्या मंदीचे परिणाम जगात जाणवले.अमेरिकेत अनेक खाजगी बेंका बुडाल्या ,मंदीवर उपाय म्हणून जादा चलन छापून अमेरिकेने उपाय करण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर भारताने जादा चलन छापून विविध कल्याणकारी योजना राबविल्या. याच काळात पायाभूत सुविधा पेक्षा योजनावर आधीक खर्च झालाच पण प्रचंड भ्रष्टाचार घडले व आर्थिक विकास साधारणच राहिला .
आपला देश कृषिप्रधान देश मानला जातो,सन २०१४ नंतर शेती,उत्पादन व सेवा या तीन क्षेत्राच्या योगदानावर देशाचा विकास अवलंबून असतो हे ओळखून नीती आयोगाद्वारे विविध पावले उचलली गेली व सेवा क्षेत्राचे योगदान ५६ % तर कृषी क्षेत्रचे योगदान १९% आहे.गेल्या पाच वर्षात झालेल्या अनेक नव्या योजना मुळे कृषी क्षेत्राचे योगदान वाढविणे, पायाभूत सेवांना प्राधान्य दिले गेल्याने भारताची आर्थीक प्रगती अधिक वेगाने होत आहे.
मानसिकता बदल व व्यवस्था निर्मिती चे नवे धोरण स्वीकारून मोफत न देता लोकांचा सहभाग व सर्वांचा विकास हि नीती स्वीकारल्याने सध्या जीडीपी वाढ झालेली दिसते.
उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना विनायक गोविलकर म्हणाले की, कर्ज घेणे व ते न फेडणे हा अधिकार असल्याची भावना, वृत्ती संपली पाहिजे ,वसुली साठी स्वतंत्र व्यवस्था हवी,रुपया व डॉलर मधील फरक कमी होण्यासाठी भारतीय चलनाचा वापर वाढला पाहिजे.सध्या डॉलरची मागणी पुरवठ्या पेक्षा जास्त आहे ,हीच परिस्थिती भविष्यात रुपयाची झाली तर फरक जाणवेल.सध्या बेरोजगारी,वाढती जनसंख्या,सामाजिक प्रश्न अश्या अनेक समस्या ,आव्हाने आहेत पण येत्या काळात नव्या सरकारचे नियोजन पाहता पूर्वीचे सोन्याचे दिवस पुन्हा अनुभवता येतील.
भगवान बाबा मल्टीस्टेट चे अध्यक्ष मयूर वैद्य यांनी व्याख्यान माला उपक्रमाचे कौतुक करून यात सहभागी होण्याची संधी दिल्या बद्दल वनवासी कल्याण आश्रमाचे आभार मानले.तसेच भगवान बाबा मल्टीस्टेटच्या विविध योजनांची माहिती दिली.
श्री.विशारद पेटकर यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृह,आरोग्यप्रकल्प , आरोग्यरक्षक,शेतीविकास,ग्रामविकास आदी आयामा विषयी माहिती दिली.श्री.शेखर कुलकर्णी यांनी गीत सादर केले.
COMMENTS