नगर- आदिवासी ,वनवासी बांधवासाठी गेल्या अनेक वर्षा पासून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते तनमनधनाने निस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. वनवा...
नगर-
आदिवासी ,वनवासी बांधवासाठी गेल्या अनेक वर्षा पासून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते तनमनधनाने निस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. वनवासी ,शहरवासी आपण एकच आहोत हि भावना जागृत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात येत आहे. या कार्याला अधिक गती देण्याचे कार्य कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेच्या माध्यमातून घडल्याचे मत मा.दिलीपजी गांधी यांनी व्यक्त केले.
वनवासी कल्याण आश्रम नगर शाखेतर्फे अर्बन को.ऑप.बँक, टीजेएसबी सहकारी बँक व श्री.संत भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या यांच्या सहकार्याने आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचा शुभारंभ माऊली सभागृह येथे माजी केंद्रीय मंत्री तथा नगर अर्बन बँक चेअरमन खा.दिलीपजी गांधी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाला .यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, वनवासी कल्याण आश्रम ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ.ठमाताई पवार,पश्चिम प्रांत सचिव शरद शेळके ,डॉ . कुंडलिक पारधी ,वनवासी कल्याण आश्रम नगर अध्यक्ष महेंद्र जाखेटे,सचिव निळकंठ ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मा. दिलीप गांधी म्हणाले की, वनवासी कल्याण आश्रमाने बदलत्या काळात नव्या विचारणी प्रयत्न केले पाहिजे,वेबसाईट, मेल अशा साधनांचा वापर करून प्रचार व प्रसार केला तर जगातून मदत मिळू शकते .यावेळी त्यांनी नगर अर्बन बेंके तर्फे सभासदांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या नवीन आरोग्य दीप योजनेची माहिती दिली. व या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात महेंद्र जाखेटे यांनी सांगितले की, १९५२ मध्ये वनवासीच्या विकासाचे स्वप्न बाळगून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य सुरु झाले.सध्या २३५ वसतिगृहात हजारो वनवासी विदयार्थी शिक्षण घेत आहेत.नगर शाखेने अकोल्यात उभारलेल्या नवीन अत्याधुनिक वसतिगृहात दीडशे मुलांची संपूर्ण व्यवस्था आहे.८२ आरोग्यरक्षक २५० पाड्यावर सेवा देत आहेत. वनयात्रा आयोजित करून शहर वासियांना प्रत्यक्ष वनवासी जीवन व सहवास घडवून संपर्क वाढविला जात आहे.या कार्यात सहभागी होण्यासाठी,आर्थीक मदती साठी नागरिकांनी सहकार्य करावे व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमातील मुख्य अतिथी वनवासी कल्याण आश्रमाचे माजी विध्यार्थी श्री.कुंडलिक पारधी यांनी त्यांचा संघर्षमय जीवनपट व्यक्त केला. अथक प्रयत्न व जिद्दीने त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ.ठमाताई पवार यांच्याशी सौ. वृशाली पांचाळ व सौ. विद्या पटवर्धन यांनी ‘वनवासी कल्याण जीवन व कार्य’ या विषयावर मुलाखतीतून संवाद साधला.
यावेळी ठमाताई पवार म्हणाल्या की, वनवासी कल्याण आश्रमात भाकरी करण्याचे काम करताना कार्यकर्त्यांचे विचार समजत गेले,समाजाचा स्वत:चा विकास करायचा असेल तर आधी स्वत: बदल स्वीकारला तरच इतरांना समजवता येईल हे उमजले व त्यासाठी शिक्षणाचे महत्व ओळखून शिकण्यास सुरवात केली.पाटी नाही,लाईट नाही अशा परिस्थितीत जमिनीवर अक्षरे गिरवून शिकले.
वनवासी मुलांन प्रमाणेच महिलांच्या समस्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली ती वनवासी कल्याण आश्रमातून .महिलांमध्ये हि व्यसनांचे प्रमाण पूर्वीच्या काळी होते,त्यामुळे त्या काळी कार्य करताना त्यांना भजनी मंडळ ,बचत गट माध्यमातून त्यांना व्यसना पासून दूर करणे व रोजगार देण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.
शिकलेल्यांना नोकऱ्या भेटत नाहीत मग कमी शिकलेल्या वनवासी महिला, युवतींना नोकऱ्या भेटणार नाहीत हे ओळखून त्यांना शिवणक्लास, घरगुती उत्पादन प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला.
वनवासी परंपरा,कला,संस्कृती ,देवपूजा टिकावी यासाठी दिंडीचे आयोजन करून त्यातून नवा विचार समाजात जोपासण्यासाठी प्रयत्न केले. आज पर्यंत जे काही पुरस्कार मिळाले त्याचे सर्व श्रेय त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला दिले.
दिल्ली येथे मिळालेला मानव संसाधनचा पुरस्कार घेताना आपले समाज बांधव सोबत यावेत यासाठी ठ्माताई यांनी विमान प्रवास सुविधा नाकारून रेल्वेने प्रवास केला.फुकट कुणाला काही देऊ नये हा विचार जोपासणाऱ्या ठमाताई यांनी वनवासी बांधवांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी शहर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळातील मोदी सरकारच्या योजनांनमुळे आज आमच्या कर्जत,पनवेल परिसरातील १२० घरात गँस वापरला जात आहे, त्यामुळे वृक्षतोड प्रमाण कमी झाले असून पर्यावरण रक्षण होत आहे.शासनाच्या सहकार्याने आज १२६ घरकुले वनवासी बांधवानी स्व: त बांधकाम करून उभारली आहेत.
यावेळी त्यांनी मुलाखतीचा शेवट कातकरी भाषेत गीत सादर करून केला.प्रथेप्रमाणे ओंकार देऊळ गावकर यांनी ‘जीवन दीप जले’ हे गीत सादर केले.सूत्रसंचालन संध्या देवभानकर यांनी केले . कार्यक्रमाची सांगत पसायदानाने झाली.
COMMENTS