श्री.अरुणरावजी धर्माधिकारी यांनी ८१ व्या वाढदिवसा निमित्त अकोले येथील गृहक वसतिगृहास एक लाख रुपयांची देणगी. समाजाचे हित ओळखून ...
श्री.अरुणरावजी धर्माधिकारी यांनी ८१ व्या वाढदिवसा निमित्त अकोले येथील गृहक वसतिगृहास एक लाख रुपयांची देणगी.
समाजाचे हित ओळखून कार्य
करणारे ,संस्कृती व परंपरेचा वारसा जोपासणारे सच्चे कार्यकर्ते अरुणजी यांचे कार्य कौतुकास्पद – श्री.नाना
जाधव , पश्चिम महा प्रांतसंघचालक
अकोले - वयाच्या ८१ व्या वर्षी वाढदिवसानिमित्त समाजाची
जाणीव ठेवून गृहक वसतिगृहास एक लाखाची देणगी देणारे समाजाचे हित ओळखून कार्य
करणारे ,संस्कृती व परंपरेचा वारसा जोपासणारे सच्चे कार्यकर्ते अरुणजी धर्माधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत प्रांत
संघचालक श्री.नाना जाधव यांनी व्यक्त केले.
अकोले येथील
गुहक वसतिगृहात उषारविंद प्रतिष्ठानच्या वतीने श्री.नाना जाधव यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात श्री.अरुणजी धर्माधिकारी
यांच्या वाढदिवसा निमित्त वसतिगृहास एक लाख रु.देणगीचा धनादेश प्रा.डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते जनजाती कल्याण आश्रम प्रांतसचिव
श्री.शरद शेळके यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी नाना बोलत होते.याप्रसंगी
मा. डॉ.खंडेलवाल,
जनजाती कल्याण आश्रम उत्तर विभाग अध्यक्ष श्री.बाळासाहेब मुळे,दक्षिण विभाग अध्यक्ष श्री. महेंद्र जाखेटे, उपस्थित
होते.तसेच गेली ४० वर्ष वसतिगृहाची धुरा संभाळनारे चंद्रभान टेके,नानी टेके यांना प्रतिष्ठान तर्फे
आदर्श सेवाव्रती दांपत्य जीवन गौरव
पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी नाना
जाधव म्हणाले की,
समाजात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या दांम्पत्यास रोख रक्कम व मानपत्र देवून जीवन गौरव पुरस्कार देण्याचा उषारविंद प्रतिष्ठानचा उपक्रम समाजात
कार्य करणार्यांना निश्चित प्रेरणा देईल व यातून अनेक कार्यकर्ते निर्माण होतील.
वसतिगृह उभारणीत
सिहाचा वाटा असणारे डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, अकोले येथे प्राध्यापक असताना आदिवासी
मुलांच्या अडचणींची जाणीव झाली.४० वर्षा पूर्वी ३ मुलां साठी सुरु झालेले वसतिगृह ते
आज उभी असलेली भव्य वास्तू या साठी अनेकांनी केलेले सहकार्य मोलाचे असून माझ्या
हस्ते देणगी देण्याचे भाग्य मला लाभले व असे भाग्य सतत लाभावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शरद
शेळके यांनी जनजाती कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी श्री.प्रशांत आढाव,डॉ. ठाकरे,श्री.विशारद
पेटकर,श्री.बाळासाहेब खांदाट, शिवदास पाडवी यांनी परिश्रम
घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हेमंत धर्माधिकारी यांनी केले तर आभार पेटकर
यांनी मानले.
COMMENTS