दि.१४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त *जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र च्या वतीने ओम साई मंगल कार्यालय, घोडेगाव या ठिक...
दि.१४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त *जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र च्या वतीने ओम साई मंगल
कार्यालय, घोडेगाव या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे महासम्मेलन उत्साहात
पार पडले. डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच आदिवासींच्या क्रांतिकारकांचे पूजन करून
कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमामधील मुख्य उद्देश हा
राज्यघटनेतील कलम ३४२ मध्ये अमूलाग्र बदल करून धर्मांतरीत आदिवासीना राज्यघटनेतील
आदिवासींच्या सुचीतून वगळण्यासाठीची मुख्य मागणी होती.कार्यक्रमाची सुरुवात घोडेगावातून
भव्य रॅलीच्या स्वरूपात झाली. हजारोंच्या उपस्थीतीत लोकांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला
दिंडी , महिलांचे लेझीम पथक, गोफ
पथक, पावरा वाद्य, सांस्कृतिक वाद्य
अशा स्वरूपातली भव्यदिव्य रॅली घोडेगावमध्ये पार पडली. आदिवासी क्रांतिकारकांवरील
माहितपट (चित्रफिती) दाखविण्यात आली. मुख्य
वक्त्यांनी हजारोंच्या समुदायाला संबोधले
आणि मार्गदर्शन केले.समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी केलेल्या या
मार्गदर्शनामुळे सर्व जनसमुदाय फार उत्साही व भारावून गेला.
विविध क्षेत्रातील नामवंत वक्ते आले
होते त्यामध्ये प्रामुख्याने डॉ.विशाल
वळवी, नंदूरबार यांनी बोगस आदिवासी या विषयाबाबत न्यायालयातील प्रलंबीत
केसेस तसेच आदिवासी समाजातील बोगस बाबत शासकीय उदासीनता यावर भाष्य केले.
ॲड
किरण गभाले ,
प्रांत
सहसंयोजक यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी
असलेल्या घटनात्मक तरतूदी यावर प्रबोधन केले प्रामुख्याने राज्यघटनेतील ३४२ बाबत
विवेचन करण्यात आले.
कातकरी समाजाच्या महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महिला
ठमाताई पवार यांनी कातकरी भाषेत संबोधून सर्वांची मने जिकूंन घेतली, समाजातील नैसर्गिकता टिकावी त्याचबरोबर जुनं ते सोन म्हणत समाजातील जुन्या
चालिरिती रूढी परंपरा पूजा पद्धती टिकाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे
तसेच निसर्ग वाचला तर आपण वाचणार आहोत हा मुद्दा प्रामुख्याने मांडला.
प्रा. शरद शेळके आदिवासी समाजाला
संस्कृती टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.आदिवासी समाजातील परिस्थिती वैचारिक
प्रवाह आणि समाजाची होत चाललेली दयनीय अवस्था यावर भाष्य केले तसेच आदिवासी
समाजाने एकजूट राहून आपलाच आपण विकास केला पाहिजे ही भूमिका मांडली सर्व संघटना
यांनी एकत्र येऊन आदिवासी विकासाबाबत एक रूपरेषा ठरविण्याचे आवाहन देखील शेळके
सरांनी केले.
कु. दिपाली दत्तात्रय लोखंडे रा.येणवे खु,
ता. खेड हि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्या
बद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
आशीर्वाद ह. भ. प. कोकाटे महाराज यांनी दिले.त्याचबरोबर
जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र, प्रांत
संयोजक निवृत्त पोलीस निरीक्षक पांडुरंग
भांगरे, ॲड
. गोरक्ष चौधरी महाराष्ट्र, प्रांत सहसंयोजक ,
विनायक सुरतणे यांनी आदिवासींच्या वैचारिक मतप्रवाहवर तसेच शासकीय
योजना राबवताना सामाजिक अडचण ,प्रशासकीय उदासीनता आणि शिक्षणातील हवे असलेले
अमूलग्र बदल यावर भाष्य केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी होत्या, त्यातही
कातकरी समाजाच्या महिलांचा मोठा सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. विजय भालिंगे
यांनी प्रास्ताविक केले तर युवराज लांडे यांनी आभार मानले
कार्यक्रमासाठी यशस्वीरित्या पार
पाडण्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद,
जनजाती सुरक्षा मंच,महाराष्ट्र पुणे जिल्हा यांच्या वतीने मानण्यात आले.
COMMENTS