कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला तपपूर्ती समारोह माऊली सभागृहात २५ ते २९ मे सायं. ६ .०० वा. नगर- जनजाती कल्याण आश्रम, संस्कार भारत...
कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला तपपूर्ती समारोह
माऊली सभागृहात २५ ते २९ मे सायं. ६ .०० वा.
नगर- जनजाती कल्याण आश्रम, संस्कार भारती,राष्ट्रहित संवर्धक मंडळ आणि भारत भारती नगर यांच्यातर्फे कै.ग.म.मुळे
स्मृती व्याख्यानमाला तपपूर्ती समारोहाचे आयोजन
करण्यात आले आहे . गेल्या ११ वर्षा पासुन नगर शहरात या व्याख्यान मालेचा उपक्रम
सुरु आहे.ही व्याख्यानमाला सुरवातीला रावसाहेब
पटवर्धन स्मारकात छोटेखानी स्वरूपात सुरु झाली होती तर आज ही व्याख्यान
माला माऊली सभागृहात मोठ्या स्वरूपात आयोजित केली जाते. यासाठी नगरकरांचा
सातत्याने भरघोस प्रतिसाद व आशीर्वादही प्राप्त होत आहे.
लोकरंजनाचा हेतू
न ठेवता सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने व्याख्यानमालाचे आयोजन केले जाते.कोव्हिड
काळाच्या संकटातही गेली दोन वर्ष आभासी पद्धतीने ही व्याख्यानमाला आयोजित केली जात
होती.
यंदा ही
व्याख्यानमाला माऊली सभागृहात दि.२५ ते २९ दररोज सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.जनजाती कल्याण आश्रम सलग ११ वर्ष ही व्याखानमाला आयोजित करत होती.यावर्षी त्यांच्या बरोबर भारत
भारती,संस्कार भारती व राष्ट्रहीत संवर्धक मंडळ
सहभागी होत आहे.दि.२५ मे रोजी प्रज्ञाचक्षु
.पूज्य मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या शुभ हस्ते तपपूर्ती व्याख्यानमाला सुरु होत आहे.तसेच त्यांच्या
हस्ते “विमर्श” विचारांचा या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.श्री.विशारद पेटकर
यांनी या स्मरणिकेचे संपादन केले आहे. यावेळी आ.आशिषजी शेलार पहिले पुष्प गुंफणार
आहेत.यावेळी जनजाती कल्याण आश्रम नगरचे अध्यक्ष महेंद्र जाखेटे,भारत भारतीचे अध्यक्ष चेतन जग्गी,संस्कार भारतीचे
अध्यक्ष अॅड.दीपक शर्मा,राष्ट्रहित संवर्धन मंडळाचे अध्यक्ष
महेंद्रभाई चंदे व विविध क्षेत्रातिल मान्यवर उपस्थित असतील.
व्याख्यानमाला कार्यक्रम पत्रिका -
१) बुधवार २५ /५/२०२२ , वक्ते मा.आमदार आशिषजी शेलार,मुंबई.विषय – उद्याचा महाराष्ट्र .प्रमुख
उपस्थिती .पूज्य मुकुंदकाका जाटदेवळेकर.
२) गुरुवार २६/५/२०२२ , वक्ते – सिनेनाट्य अभिनेते
श्री.राहुलजी सोलापूरकर .विषय- अज्ञात स्वातंत्र्य संग्राम .प्रमुख उपस्थिती लखनौ
विद्यापीठ कुलगुरू सर्जेराव निमसे.
३) शुक्रवार २७ /५/२०२२,
वक्ते – राज्यसभा सदस्य मा.डॉ.सुधांशूजी त्रिवेदी .विषय- भारत का सांस्कृतिक
राष्ट्रवाद .प्रमुख उपस्थिती उद्योजक मा. श्री.नरेंद्रजी फिरोदिया.
4) शनिवार २८ /५/२०२२, वक्ते – पुण्याचे श्री.अक्षयजी
जोग,पुणे .विषय – स्वा.सावरकर आक्षेप आणि वास्तव.प्रमुख उपस्थिती उद्योजक
मा.श्री.अनुरागजी धूत.
५) रविवार २९ /५/२०२२,वक्ते – पर्यावरण दूत
पद्मश्री अनुराधाजी पौडवाल. विषय- गायकी
ते पर्यावरण कार्यकर्ता एक प्रवास. प्रमुख उपस्थिती पर्यावरण कायदा अभ्यासक , न्यू
लाँ कॉलेज प्राचार्य श्री.एम.एम.तांबे .
व्याख्यानमाला दररोज
सायंकाळी ६.०० वा. सुरु होईल .
श्रोत्यांनी १० मिनटे आधी उपस्थित राहून सहकार्य करावे. व्याख्याना पूर्वी विषयाला अनुसरून संस्कार
भारतीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत,अशी माहिती संयोजन समिती
प्रमुख सुधीरजी लांडगे यांनी दिली .या व्याख्यानमालेस नगरमधील व जिल्ह्यातील
नागरिकांनी मित्र परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन कै.ग.म.मुळे स्मृती
व्याख्यानमाला संयोजन समितीने केले आहे.
COMMENTS