जनजाती कल्याण आश्रम, नगर
४० वर्षांपासून नगर शाखेचे काम चालू आहे. नगर जिल्ह्यात अकोले तालुका वनवासी भाग आहे.अकोले तालुक्यात वनवासी भागात अनेक उपक्रम चालू आहेत. विद्यार्थी वसतिगृह, ग्रामविकास, आरोग्यरक्षण, चतुःसूत्री पद्धतीने शेती, खेलकुद अशा आयामांद्वारे वनवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य चालू आहे.
वसतिगृहामध्ये शिकलेले वनवासी विद्यार्थी आज अनेक मोठ्या पदांवर कार्य करतात. डॉ.दशरथ केंकरे हे अकोले येथील वसतिगृहाचे विद्यार्थी आज त्यांचे पुण्यामध्ये मोठे आर्थोपेडीक हॉस्पिटल आहे. नुकतीच वसतिगृहाची नवीन इमारत बांधलीअसून सर्व सुविधांचा विद्यार्थी लाभ घेत आहेत.
‘तू मै एक रक्त...’ हे ब्रीदवाक्य मनाशी धरून वनवासी बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे.
आरोग्यशिबिरे, व्यक्तिमत्व विकास शिबिरे यांचे आयोजन संस्थे तर्फे करण्यात आले आहे. वसतिगृहातील मुलांना शहर दर्शन तसेच विविध कारखाने, रेल्वे स्टेशन, रणगाडे प्रदर्शन, ऐतिहासिक स्थळे दाखवून परिपूर्ण माहिती देऊन त्यांना शहरी जीवनाचे दर्शन घडविण्यात आले आहे..
शहरातील कार्यकर्ते धान्य, वस्तू, औषधे, पैसे असे निधीद्वारे संकलित करतात. अकोले येथे जाऊन आरोग्यशिबिरे, भाऊबीज, रक्षाबंधन असे उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात. बचतगटाच्या माध्यमातून वनवासींच्या आर्थिक सक्षमतेचा प्रयत्न
भजनीमंडळाद्वारे हिंदू संस्कृतीचे ऐक्य टिकवून धर्म जागरण हा उपक्रम चालविला जातो. जेणेकरून बाह्य शक्तींद्वारे होणारे वनवासींचे धर्मांतरण रोखले जावे व त्यांच्या परंपरा ,संस्कृतीची जोपासना व्हावी.त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या साठी नवीन उपक्रम राबविण्यासाठी सध्या विचार व कार्य सुरु आहे.यासाठी गेल्या चाळीस वर्षांत नगरमधील हजारो कार्यकर्त्यांनी तनमनधनाने केलेले कार्य अनमोल आहे. त्यांच्या कार्याची माहिती या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यास सर्वांची साथ लाभणारच आहे..
COMMENTS